Breaking News

जिजाऊचे प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे शिवबा घडले - सौ. सिमाताई गोर्डे


संगमनेर प्रतिनिधी
मन आणि बृध्दी जर योग्य ठेवली तर आयुष्य आपोआप घडत जाते. तुमचे स्कील, संभाषण चातुर्य उत्तम असले पाहिजे. जिद्द आणि तीव्र इच्छा असेल तर तुम्ही प्रभावशाली व्यक्तीमत्व केव्हाही बनवू शकता. प्रभावशाली व्यक्तीमत्व घडविण्यासाठी आपल्याला स्वत:ला सिध्द व्हावे लागते. पालकांची भूमिका उत्तम असेल तर मुले आपोआप घडतात. जिजाऊंचे व्यक्तिमत्व इतके प्रभावशाली होते, त्यामुळे शिवबा घडले, असे प्रतिपादन सिमा गोर्डे यांनी केले. 

राजमाता जिजाऊ स्मृतीदिनानिमित्त येथील राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्यावतीने पावबाकी रोड, सातपुते नगर येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. सामाजिक कार्यकर्त्या कांचन थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. बाबा खरात होते. व्यासपीठावर सुलभा दिघे, डॉ. नम्रता पानसरे, जे. के. सातपुते, शारदा सातपुते, श्रीमती ललिता दिघे, सिमा काकड, डॉ. जया घोलप, अनिता दिघे, गिता थोरात, दिपाली देशमुख, प्रा. वैशाली कडलग आदी उपस्थित होते. यावेळी महिलांना आंबा, कडूलिंब, चिकू रोपांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना गोर्डे म्हणाल्या, राजमाता जिजाऊ हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज घडविले. जिजाऊंनी संकटातून वेळोवेळी मार्ग काढला. रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी काम केले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधी आहे. पुढील पिढी अधिक संस्कारक्षम घडविण्यासाठी प्रत्येक महिलेने जिजाऊचे गुण अंगीकारले पाहिजे. यापुढे विविध सण एकत्र येवून साजरे करावेत. त्यामुळे सर्वांचा आनंद द्विगुणित होईल. या पावसाळ्यात प्रत्येक महिलेने घरापुढे, परसबागेत वृक्षांचे रोपन करुन त्यांचे संगोपण करावे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी प्रा. बाबा खरात यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे डॉ. नम्रता पानसरे यांनी महिलांचे आरोग्य, आहार, मुलांचे संगोपन याबाबत मार्गदर्शन केले. सुलभा दिघे यांनी गोर गरीबांना मदत करण्याचे आवाहन केले. 

यावेळी सर्वश्री वृषाली सातपुते, माधुरी खर्डे, मनिषा सातपुते, सविता देशमुख, सुनिता आंबरे, मंगल भागवत, शैला आवारी, आशाताई पोखरकर मिनाक्षी घोडेकर, मंगला गायके, सुरेखा घोडेकर, ललिता देशमुख, कविता बच्छाव, मुक्ता घोडेकर, पूनम महाले, सोनाली पाटिल, उवल गोडगे, वैशाली घुले, मिना घोडेकर, नामदेव कहांडळ,संजय साबळे, विशाल काळे, सचिन गुंजाळ, कृष्णा दिघे आदी उपस्थित होते. यावेळी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रारंभी उज्ज्वला नेहे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शारदा सातपुते यांनी केले. मिना देशमुख यांनी आभार मानले.