Breaking News

वसतिगृहाच्या प्रकल्पासाठी पुढाकार घ्या : बिडवे


कोेपरगांव शहर प्रतिनिधी : शहर नाभिक संघटनेने अल्पावधीत ३५ लाख रूपये खर्च करून श्री संत सेना महाराज वसतीगृह उभारले आहे. या वसतिगृहाच्या विस्तारित प्रकल्प उभारणीस ६५ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन समाजाचे शहर व नगर जिल्हाध्यक्ष किरण बिडवे यांनी केले. महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवान बिडवे यांच्या हस्ते किरण बिडवे यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यानिमित्त शिवभक्त अरविंद महाराज यांच्या हस्ते बिडवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ह. भ. प. चांगदेव वाघ होते.

याप्रसंगी परीट सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल फंड, उपाध्यक्ष सोमनाथ व्यवहारे, क्रिडाशि क्षक राजेंद्र कोहकडे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे के. एन. वाघ, सुधाकर बोरूडे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी गणेश बिडवे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचलन विनायक खडांगळे, दिनेश संत यांनी केले. कार्यक्रमासाठी रावसाहेब जाधव, देविदास बिडवे, नरेंद्र मंडळ यांनी पुढाकार घेतले. साईनाथ कदम यांनी आभार मानले.