Breaking News

राजकारण विरहित समाजकार्य सतत सुरु ठेऊ : विखे


प्रवरानगर प्रतिनिधी 

सध्या व्हॉट्सअप, फेसबुकसारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून विनासायास प्रसिद्धीचा किंवा विनाकारण टिका करण्याचा उद्योग सहज शक्य होत आहे. मात्र पद्मश्री डॉ. बाळासाहेब विखेंनी घालून दिलेल्या समाजकार्याचा वसा पुढे नेताना सर्वांच्या सहकार्याने राजकारण विरहित समाजकार्य सतत सुरु ठेऊ, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी व्यक्त केला.

प्रवरा परिसराचे सुपुत्र आणि राज्याचे विरोधी पक्षनेते यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी येथील विखे पाटील पॉलिटेक्निक येथे आयोजित केलेल्या वृक्षारोपण, नेत्रतपासणी शिबिराप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. नामदेव गरड, प्रा. सोमनाथ लव्हाटे, प्रा. अर्जुन आहेर, प्रा. अभिषेक निबे, प्रा. वसिम तांबोळी, प्रा. एम. आर. ढवळे आदी उपस्थित होते. प्रारंभी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. मनोज परजणे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. शिरूर येथील मगर हॉस्पिटल यांच्यातर्फे राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्माचाऱ्यांची मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये १५० सेवकांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी डॉ. रूपाली मगर यांचे सहकार्य लाभले. प्रा. अर्जुन आहेर यांनी आभार मानले.