Breaking News

डॉ. अरुण गायकवाड यांची तज्ज्ञ सदस्य म्हणुन नियुक्ती

संगमनेर/प्रतिनिधी। - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमन 2016 नुसार महाविद्यालयीन पदव्युत्तर शैक्षणिक दर्जा वाढविणे, महाविद्यालयात अध्ययनाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील गुणवत्तापुर्ण पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार करणे व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने महाविद्यालय पदव्युत्तर शिक्षण मंडळ कार्यरत आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, 2016 कलम 44(3)(क) नुसार तज्ज्ञ प्राध्यपकांची नामनिर्देशन कुलगुरु करतात. यानुसार संगमनेर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंनी ’महाविद्यालयीन पदव्युत्तर शिक्षण मंडळावर’ वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा तज्ज्ञ गटातुन सदस्यपदी नामनिर्देशन केल्याचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे अघ्यक्ष बिहालीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, सचिव डॉ.अनिल राठी, जनलर सेक्रेटरी नारायण कलंत्री व खजिनदार प्रकाश बर्डे व व्यवस्थापनातील अन्य सदस्य तसेच प्राचार्य डॉ.के.के.देशमुख, उपप्राचार्य प्रा.राजेंद्र लढ्ढा , उपप्राचार्य डॉ.रविंद्र ताशिलदार, शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.