निकेश अरोरा ‘पालो अल्टो’च्या सीईओपदी

मुंबई : निकेश अरोरा यांच्या खांद्यावर पालो अल्टो नेटवर्क या सायबर सिक्युरिटी फर्मच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) धुरा देण्यात आली आहे. अरोरा यांना पालो अल्टो नेटवर्ककडून 12.8 कोटी डॉलरचं (सुमारे 858 कोटी रुपये) पॅकेज देण्यात आले आहे. जगात सर्वाधिक पगार घेणार्‍या सीईओंच्या यादीत अरोरा यांचं नाव दाखल झालं आहे. 50 वर्षीय निकेश अरोरा यांची मार्क मिकलॉकलीन यांच्या जागी नियुक्ती झाली आहे. मिकलॉकलीन हे गेल्या सात वर्षांपासून पालो अल्टो नेटवर्कच्या सीईओपदावर होते. सीईओपदासह निकेश अरोरा हे पालो अल्टो नेटवर्कचे प्रेसिडंटही असतील. त्यामुळे मिकलॉकलीन यापुढे पालो अल्टो नेटवर्कचे व्हाईस चेअरमन म्हणून कंपनीशी जोडलेले असतील.
Labels:

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget