Breaking News

वनविभागातर्फे मोफत गॅस कनेक्शनचे वाटप


आश्वी : प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील मागसवर्गीय समाजातील लाभार्थींना वनविभागाच्यावतीने मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ‘ धूर मुक्त गाव’ संकल्पनेतून वनविभागातंर्गत वनव्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीने संयुक्तपणे मागसवर्गीय समाजातील लाभार्थीना मोफत गॅसचे वाटप केले. संरपच श्रीमती शांता घुगे आणि संगमनेरचे वनक्षेत्रपाल पारेकर हे यावेळी उपस्थित होते. 

यावेळी उपसंरपच मनिषा कदम, ग्रामसेविका रोहिणी नवले, वनसमितीचे अध्यक्ष राजू कंडाळे, वनपाल शेख, वाडेकर, गागरे, सोनवणे, राजेंद्र जाधव, रावसाहेब घुगे, रामभाऊ कदम, रामराव घुगे, मदन कदम, भाऊराव कदम, जय कदम आदी उपस्थित होते.