Breaking News

अभिनेते मकरंद अनासपुरे उद्या कोपरगावात


कोपरगाव : प्रसिद्ध विनोदी सिनेअभिनेते व आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबाला आणि शहीद जवानांच्या कुटुंबाला मदत करणा-या नाम फौंडेशनचे मकरंद अनासपुरे उद्या {दि. १५ } कोपरगावला येत आहेत. तालुक्यातील १० वी व १२ वीच्या गुणवंतांचा सत्कार त्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाच्यावतीने देण्यात आली. यावेळी माजी आ. अशोक काळे, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सहसचिव स्नेहल शिंदे, युवा नेते आशुतोष काळे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे आदी उपस्थित राहणार आहेत.