Breaking News

मुंबई विद्यापीठाचे नामांतर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करा- मधुकरराव कांबळे


अकोला - मुंबई विद्यापीठाचे नामातंर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करावे, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती सा हित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)मधूकरराव कांबळे यांनी शुक्रवारी येथे दिली. त्यांनी मुंबईतील घाटकोपर भागात अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक सरकार उभारणा असल्याचेही सांगितले.
मुंबई विद्यापीठाला मॉ जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली असून, त्यानंतर लगेचच शुक्रवार,15जून रोजी कांबळे यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केली. यासंदर्भात नामातंराच्या नव्या वादाला ही सुरू वात समजायची का असा प्रश्‍न पत्रकारांनी उपस्थित केला असता मुंबई विद्यापिठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची आमची जुनीच मागणी असल्याचे कांबळे यांनी सांगितले. संयुक्त महाराष्ट्रचा आवाज अण्णाभाऊ साठे यांनी बुलंद केला. कामगार,कष्टकरी,समतावादी चळवळ उभी केली. भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबध त्यांनी दृढ केले. त्यांच्या अजरामर साहित्याने समाज जागृती केली,या भूमीपुत्राचे नाव मुंबई विद्यापीठाला दिल्यास विद्यापीठाचा गौरव वाढणारा आहे. म्हणून ही आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे हा वादाचा विषयच नसल्यसाचे त्यांनी अधोरेखित केले. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक बांधण्यासाठी शासनाने साडेसहाशे कोटीची तरतूद केली असून, हे भव्य स्मारक मुंबईतील घाटकोपर भागातील चिराग नगर येथे साकारणार आहे. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ग्रंथालय,राष्ट्रीय व राज्य लोकसेवा आयोगाची विद्यार्थ्यांना पूर्व तयार करता यावी म्हणून, निवासी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल.वातानुकूलीत सभागृह, मुला-मुलीचे वसतीगृही येथे असेल. याचा आराखडा लवकरच तयार करणार असून, त्याअगोदर चिराग नगरातील लोकांचे इमारतीमध्ये पूर्नवसन क रण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.