Breaking News

मुल्ला यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणार - ज्ञानेश्‍वर कानडे


ठाणे - विविध माध्यमिक शिक्षक संघटना ज्या संघटनेला संलग्न आहेत, अशा महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी आणि महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाने (फेडरेशन) कोकण पद विधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, या पाठिंब्याचा निर्णय फेडरेशनशी संबधित असलेल्या सर्व संघटनांना कळविण्यात आला असून मुल्ला यांचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची रेष असल्याची प्रतिक्रीया महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कानडे यांनी दिली आहे. 
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे हजारो सदस्य आहेत. शिवाय, या संघटनेला अनेक शिक्षकांशी संबधित एज्यकेशनल इंटरनॅशनल (ईआय), ऑल इंडिया सेकंडरी टिचर्स फेडरेशन ( एएसटीएफ), ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एज्यकेशनल असोशिएशन ( एआयएफईए) यांच्यासह अनेक संघटना संलग्न आहेत. त्यामुळे सदर संघटनेच्या पाठबळामुळे नजीब मुल्ला यांचे पारडे अधिकच जड झाले आहे. या संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कानडे यांनी शनिवारी नजीब मुल्ला यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर के ला. यावेळी आ. जितेंद्र आव्हाड, माजी नगरसेवक अमीत सरय्या आदी उपस्थित होते.
यावेळी कानडे यांनी सांगितले की, नजीब मुल्ला यांना पदवीधर, शिक्षक आणि पदव्युत्तर तरुणांच्या समस्यांची चांगली जाण आहे. त्यांनी नगरसेवकपदाच्या काळात ठाणे शहरात केलेल्या विकास क ामांची आम्हाला माहिती आहे. तरुणाच्या हाती सूत्रे गेली की समस्या सुटण्यास वेळ लागत नाही. हे आमच्या अनेक वर्षांच्या अनुभवावरुन स्पष्ट झाले आहे. नजीब मुल्ला यांची कामाची तळमळ पाहूनच त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय संघटनेच्या सर्वच पदाधिकार्यांनी तसेच सदस्यांनी घेतला आहे. केवळ पाठिंबा देऊन आम्ही थांबणार नाही. तर, नजीब मुल्ला यांचा विजय सहज कसा होईल, यासाठी आम्ही सक्रीय राहणार असून संघटनेची सर्व मते मुल्लाच यांना मिळणार आहेत, असे सांगितले.