Breaking News

जामखेड येथे ईद उत्साहात साजरी

प्रेम आणि बंधुभावाचे प्रतिक असलेली रमजान ईद जामखेड शहरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला़ यावेळी शहर व परिसरातील हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते़ सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास मौलाना मुक्ती आफजल पठाण कासमी यांनी सर्व मुस्लिम बांधवाना नमाजाचे पठण केले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने नमाजसाठी ईदगाह मैदानावर उपस्थित होते. 
शुक्रवारी सायंकाळी चंद्र दर्शनानंतर शनिवारी शहरामध्ये ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ईदगाह मैदानावर नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ‘ईद मुबारक’ म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. चंद्र दर्शनानंतर ईद शुभेच्छा देणारे संदेश फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप अशा सोशल मीडियावर दिसू लागले. ‘ईद मुबारक’ च्या विविध पोस्टर, ‘एसएमएस’चा वर्षाव सोशल मीडियावर सकाळपासून दिसून येत होता. 
यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, प्रा. मधुकर राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, डॉ. भास्कर मोरेंसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मुस्लिम बांधवांना शूभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर उपस्थित होते