Breaking News

प्रतिक्षा भुते यांचे यश


जामखेड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रतिक्षा भुते यांची सहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट अ) पदी निवड झाली आहे. त्यांच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रतिक्षा पोपटराव भुतेने यशस्वी होत, आपले स्वप्न साकार करून यशाला गवसणी घातली आहे.

प्रतिक्षा ही तालुक्यातील खर्डा गावची कन्या असून, तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावीच झाले. नंतर तिने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले, कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये निवड होवूनही तिने, ते नाकारुन स्वतःच्या मेहनतीवर विश्‍वास ठेवत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून यश मिळविले.