Breaking News

टेंभुर्णी प्राथमिक केंद्राचा प्रश्‍न अधिवेशनात मांडणार - बच्चू कडू


सोलापूर - ब्रिटिश काळापासून प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती झाली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत तीस हजार लोकसंख्या असलेल्या टेंभुर्णी व परिसरातील 36 गावांसाठी उप जिल्हा रुग्णालयाची आवश्यकता असताना त्याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. रुग्णालयाच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बशीर जहागीरदार यांनी हा विषय आ. बच्चू कडू यांचेकडे मांडले होता. सर्व प्रकरणाचा अभ्यास केल्याने व लोकांची गैरसोय समजून सदरचे उपजिल्हा रुग्णालयाचे विषय पावसाळी अधिवेशनात मांडण्याचे आश्‍वासन दिले आहे. वेळ पडल्यास जिल्हाधिकारी क ार्यालयावर स्वतः आंदोलन करण्याची तयारी ही दर्शवली आहे. 3 एप्रिल 17 रोजी उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी मागणीचे अर्ज आरोग्य मंत्री यांना दिले होते. त्यानंतर या विषयी 22 ऑगस्ट 17 रोजी बशीर जहागीरदार यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांचे कार्यालयासमोर 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. तसेच मुंबई येते सुद्धा उपोषण करण्यात आले होते. परंतु आजतगायत शासनाने टेंभुर्णी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे विषय गंभीरतेने घेतला नाही. हे गाव पुणे-सोलापूर महामार्ग 65 वरील मोठे जंक्शनचे ठिकाण आहे. 2011 च्या जनगणनेमध्ये गावाची लोकसंख्या वीस हजाराच्या घरात होती. आज ती संख्या तीस ते चाळीस हजारापर्यंत पोहोचली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्या केंद्रावर टेंभुर्णी शहरासह आसपासची 36 गावे अवलंबून आहेत.