Breaking News

भोयरे गांगर्डा शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवोदित विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी फुले देवून स्वागत करण्यात आले. पालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. भोयरे गांगर्डा शाळेत नव्याने रुजू झालेल्या शिक्षिका आर.एल. दरेकर, एस.बी. भुजबळ यांचे, ज्येष्ठ नागरिक भगवान पवार यांचेहस्ते श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाजीराव गांगड हे होते. विद्यार्थ्यांनी देखिल उपस्थितांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.
यावेळी उपसरपंच दौलत गांगड, मधुकर महाराज लगड, प्रमोद रसाळ, भगवान पवार, शरद पवार, राजेंद्र रसाळ, सचिन रसाळ, संतोष रांजणे, संतोष केकडे, पत्रकार शरद रसाळ, मुख्याध्यापिका मंदा साबळे, बी.डी. दरेकर, एल.एस. गवळी, आर. दरेकर, एस. भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन मुख्याध्यापिक साबळे यांनी तर, आभार एस. भुजबळ यांनी मानले.