Breaking News

प्रेमाची सावली अशीच ठेवा : आ. जगताप


श्रीगोंदा प्रतिनिधी 
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवाना एकाच दिवशी भेटणे शक्य नाही. तात्या असताना {कुंडलिक जगताप} सर्व लोकांना अडीअडचणीत त्यांनी मदत केली. सर्व समाजाने खूप प्रेम करुन मला आमदार केले, त्याची जाणीव मला आहे. प्रेमाची ही सावली अशीच ठेवा, असे आवाहन आ. राहूल जगताप यांनी केले. 

रमजान ईद निमित्त आ. राहूल जगताप यांनी सर्व तालुव्यात दूध वाटप केले. याप्रसंगी ते बोलत होते. आ. जगताप यांनी तालूक्यातील विरोधकांना धक्का देत आपली छाप कायम ठेवल्याची तालुक्यात चर्चा आहे.