मंत्रीमंडळ विस्ताराचे वारे !

राज्य मंत्रीमंडळाचे वारे अनेक वर्षांपासून वाहत असले, तरी मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त भेटला नव्हता. मात्र या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचे निश्‍चित मानले जात आहे. राज्यातील विधानसभा निवडणूकांना सामौरे जाण्यासाठी, केवळ दीड वर्षांचा कालावधी उरला आहे. सत्तेत असणारे मित्रपक्ष भाजप-शिवसेना यांच्यात नेहमीच कु रघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मात्र यावेळेस अमित शाह यांनी मातोश्री वारी केल्यामुळे आपली किंमत वाढल्याचे शिवसेनेला वाटायला लागले आहे. तसेच लोकसभा निवडणूकांना आम्ही तुमच्यासोबत आहोत, त्यासाठी कमी जागा घ्यायला तयार आहोत, मात्र विधानसभा निवडणूकीसाठी सेनेला, जागा जास्त हव्यात आणि मुख्यमंत्रीपद देखील हवे आहे. हा मनसुभा सेनेच्या नेत्यांनी अनेकवेळेस बोलून दाखविला आहे. त्यामुळे येणार्‍या काळात सेना आपले वर्चस्व राज्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे भाजपाची पध्दतशीर व्युहरचना सेनेला नडणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकांचे अंदाज आताच बांधणे अवघड आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेला एक कॅबीनेट तर दोन राज्यमंत्रीपद देण्याची शक्यता आहे. सेनेबरोबराच नाराज मित्रपक्षांना देखील राज्यमंत्रीपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून केला जाऊ शकतो. त्याबरोबर मित्रपक्षांना महामंडळाची अध्यक्षपदे देऊन त्यांना भाजप आपल्या बाजून वळविण्याचा प्रयत्न करू शकतो. वास्तविक पाहता हा मंत्रीमंडळाचा विस्तार एक ते  दीड वर्षांपूर्वीच व्हायला हवा होता. मात्र शिवसेनेची गर्भित धमकीमुळे, आणि राज्यात राजकीय भूकंप होऊ नये, यासाठी सातत्याने हा शपथविधी टाळण्यात आला. नारायण राणे यांनी स्वाभिमानी पक्षांची स्थापना करत, भाजपच्या रालोआमध्ये सहभागी झाल्यामुळे, त्यांना मंत्रीपदाचे वेध लागले होते. मात्र राणे यांना राज्यसभेची उमेदवारी त्यांची तलवार म्यान करण्यात भाजप यशस्वी झाली. असे असले, तरी राणे त्यांच्या चिरंजीवांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे यासाठी आपली शक्ती पणाला लावतील. राणे यांचा वापर कोकणात भाजपची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी होऊ शकतो. मात्र राणे आज भाजपसोबत असले, तरी निवडणूक काळात ते भाजपसोबत असतील, याची कोणतीही शक्यता नाही. भाजप जरी केंद्रात आणि राज्यात सत्तेत असले, तरी भाजपसरकारविरोधात जनमत म्हणावे तसे अनुकूल नाही. कारण देशातील आजची परिस्थिती ही अराजकतेकडे वळणारी असून, सामाजिक अशातंतेचे पडसाद सध्या देशात उमटत आहे. त्यामुळे या परिस्थितीत भाजप निवडणूकांना सामौरे जाणार आहे. दुसरीकडे काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसने भाजपविरोधात मोर्चे बांधणी सुरू केली आहे. जनतेशी संपर्क अभियान या पक्षांनी मोठया प्रमाणात सुरूवात केली आहे. याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे दलित आणि मुस्लीम मतदार भाजपापासून दुरावतांना दिसून येत आहे. त्याला देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती कारणीभूत आहे. त्याबरोबर राज्यातील अनेक गंभीर प्रश्‍नांचा निपटारा करण्याचा प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे, अशा परिस्थितीत राज्यातील जनतेला आश्‍वस्त क रण्याची खरी गरज आहे. मात्र आजमितीस राज्यातील परिस्थिती पाहता सर्व काही आलबेल नाही. जाती-जातीत तेढ निर्माण होत असून, सामाजिक सलोखा बिघडवण्यात येत आहे. त्यामुळे आज मंत्रीमंडळाचा विस्तार झाला तरी राज्यातील परिस्थितीत तसूभरही फरक पडणार नाही. याउलट जर कारभार सुधारण्यावर मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष दिले, तर क दाचित भाजपला बरे दिवस येऊ शकता, अन्यथा निवडणूका तोंडावर आलेल्याच आहेत. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget