Breaking News

नवदाम्पत्यांची विष प्राशन करुन आत्महत्या

भंडारा, दि. 13, जून - तुमसर तालुक्यातील आलेसुर(गोंडीटोला) येथील नवदांम्पत्यांनी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. त्यात नवविवाहीत दांम्पत्यांपैकी पत्नी दगावली असुन पती हा अंत्यघटकेत आहे. ही घटना 12 जुनच्या पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यानची असल्याचा प्रथमिक अंदाज स्थानिकांनी वर्तवला असला तरी मंगळवारच्या सकाळी 6 दरम्यान सदर घटना उघडकीस आलेली आहे.विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केलेल्या महीलेचे नाव शिल्पा नरेंन्द्र धुर्वे (26) हे असुन अंत्यवस्थ स्थीतीत बचावलेल्या मुलाचे नाव नरेंन्द्र दौलत धुर्वे(28) दोघेही राह. आलेसुर(गोंडीटोला) असे आहे. त्या नवविवाहीत दाम्पत्यांनी विषारी द्रव प्राशन करुन जिव संपविन्याचे नेमके कारण अद्दाप कळलेले नाही.

तुमसर तालुक्यातील आलेसुर (गोंडीटोला) येथील आत्महत्या केलेल्या नवविवाहीत महीलेचे नरेंन्द्रशी चालु वर्षातील एप्रिल महीन्याच्या 28 तारखेला परंपरागत पद्धतीने लग्न लागले होते. त्या दाम्पत्यांना विवाहीत जिवनाचे जेमतेम 1 महीन्यापैक्षा जास्तचा कालावधी झालेला होता. मात्र वैवाहीक जिवनात आत्महत्येला प्रेरीत करणारे कसलेच कारण नसतांना त्या नवदांम्पत्यांनी कोणत्या कारणास्त विषारी द्रव प्राशन केले ? याची अद्दाप कसलिच माहीती मिळालेली नाही. घटना उघडकीस येताच गोबरवाही पोलीसांना पाचारण करण्यात आले. अंत्यवस्थेत बचावलेल्या नरेंन्द्रला तत्क ाळ भंडारा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र शिल्पाची प्राणज्योत मालवली आहे.
मृतक शिल्पाचे शव तुमसर उपजिल्हा शा.रुग्णालयात सवविच्छेदनाकरीता दाखल करण्यात आले आहे.मात्र विचीत्र परीस्थीतीत व लग्नाला जेमतेम एकच महीना झालेला असतांना ते नवदाम्पत्य नेमक्या कोणत्या दडपणाखाली होते,याचा उलघडा घटनेत बचावलेला नरेन्द्रंच देवु शकणार. मात्र त्याचीही स्थीती अतिशय नाजुक आहे. स्थानिकांच्या व घरच्यांच्या मते त्या दोघांमध्ये कैटुंबिक क लहानेचे ना कारण, ना भांडण मात्र त्या नवदाम्पत्यांनी एकाएकी विषारी द्रव प्राशन करुन लोकांना नाना त-हेच्या चर्चेला वाव दिल्याचे दिसुन येत आहे.