Breaking News

शिवशाही बस सुरू करण्याची शिवप्रताप संघटनेची मागणी


सोलापूर - करमाळा तालुक्यातून पुणे जिल्ह्याकडे जाण्यासाठी शिवशाही बस सुरू करण्याची मागणी, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे येथील शिवप्रताप संघटनेच्या पदाधिक ार्‍यांनी केली आहे. तालुक्यातून पुणे भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा असते. नोकरी, व्यवसाय, उद्योगधंद्यांसाठी अनेक जण पुणे भागात आहेत. करमाळा आगारातून पुण्याकडे जाण्यासाठी आरामदायक व वातानुकूलित गाडीची सोय नाही. त्यासाठी टेंभुर्णी येथून प्रवासाला सुरुवात करावी लागते. करमाळा ते पुणे चार तासांचे अंतर आहे. त्यामुळे शिवशाही बस चालू क रण्याची मागणी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. निवेदनावर शाहूराव फरतडे, संस्थापक अध्यक्ष शंभूराजे फरतडे, जिल्हाध्यक्ष ओंकारराजे निंबाळकर, तालुकाध्यक्ष महेश काळे- पाटील, शहराध्यक्ष बापू उबाळे यांच्या सह्या आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सहकार्यांने करमाळा बसस्थानकाचा कायापालट होणार आहे. प्रशस्त असे बस स्थानक निर्माण होत आहे. त्यात शिवशाही बस करमाळा आगारात आल्यास प्रवाशांची सोय होणार आहे, असे शंभूराजे फरतडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.