Breaking News

दुचाकी चोरणारा अल्पवयीन आरोपी पकडला

व्यसनांची हौस भागवण्यासाठी दुचाकी चोरी करणारा नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील अल्पवयीन आरोपीस दिल्लीगेट परिसरातून ताब्यात घेण्याची कारवाई तोफखाना पोलिसांनी केली असून त्याच्याकडून सव्वा लाख रूपये किंमतीच्या ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर शहरात तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अज्ञात चोरट्यांकडून मोटार सायकल चोरीच्या घटना मोठया प्रमाणात घडत असताना पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे एक अल्पवयीन मुलास (रा.गुंडेगाव, ता.जि.अहमदनगर) दिल्लीगेट परिसरातून संशयास्पद हालचालीवरून ताब्यात घेण्यात आले.