Breaking News

‘साईआदर्श’चे उद्या उदघाटन


राहुरी ता. प्रतिनिधी : तालुक्यातील साई आदर्श मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या उंबरे शाखेचे उदघाटन येथील अडसुरे कॉम्प्लेक्स, एसटी. स्टॅन्डजवळ येथे उद्या {दि. १५} सकाळी दहा वाजता होणार आहे. ह. भ. प. उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. 

चेअरमन मल्टिस्टेट फेडरेशन, नवी दिल्लीचे सुरेश वाबळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी दत्तात्रय आड्सुरे, कडूभाऊ काळे, नामदेव ढोकणे, शामराव निमसे, बजरंग तनपुरे, विजया ढोकणे, साहेबराव दुशिंग, विजय ढोकणे, विलास ढोकणे, सुनील आड्सुरे, नवनाथ ढोकणे, शहाराम आड्सुरे, संतोष ढोकणे, अण्णासाहेब तारडे, ज्ञानदेव क्षीरसागर आदी उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी दिली.