Breaking News

जिल्हा परिषदेत १९ ला आमरण उपोषण


शेवगाव प्रतिनिधी

भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होत नसल्याने येथील दिव्यांग संघटनेच्यावतीने दि. १९ रोजी जिल्हा परिषद आवारात आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत विविध स्वरूपातील भ्रष्टाचार व घोटाळे होत आहेत. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी यांना दि. ०६ जून रोजी पुराव्यासहित दाखल करण्यात आले आहे. याबाबत कोणत्याही स्वरूपाची हालचाल दिसून न आल्याने उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.