Breaking News

निवडणूक आयोगाकडून सांगली आयुक्तांची चौकशी

सांगली : राज्य निवडणूक आयोगाकडून सांगली महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची चौकशी करण्यात येणार आहे. आयुक्त खेबुडकर हे भाजपधार्जीने असून, पक्षपातीपणे कारभार करीत असल्याची तक्रार काँग्रेसचे नेते आणि महापौर हारुण शिकलगार यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या चौकशीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या चौकशीत राज्य सरकार हस्तक्षेप करण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी बिडमध्ये असा प्रकार पाहायला मिळाला होता.