Breaking News

क्रीडाशिक्षक वालझाडे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर


अकोले : प्रतिनिधी 

येथील मिलिंद संस्था केंद्र संचलित लोकरंजन कला मंडळ, नाशिक यांच्यावतीने दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रातील ज्येष्ठ गुणवंतांना पुरस्कार दिला जाती. यावर्षी अभिनव शिक्षण संस्थेच्या मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कुलचे क्रीडाशिक्षक ऋषिकेश वालझाडे यांना 'महाराष्ट्र भूषण राजर्षि छत्रपती शाहू महाराज’ राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल हा त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. 

लवकरच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना तळमळीने वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात सहभागी होण्यास प्रोत्साहित करून काळजीपूर्वक त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्यासाठी ऋषिकेश वालझाडे हे नेहमी प्रयत्नशील असतात. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, उपाध्यक्ष सुरेश कोते, सचिव प्राचार्य रमेशचंद्र खांडगे, कोषाध्यक्ष भाऊसाहेब नाईकवाडी, प्राचार्या अल्फोन्सा डी. प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव आदींनी अभिनंदन केले.