Breaking News

अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

जय मल्हार युवा मंच यांच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली.
मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी जमाखेड पं. समितिचे सभापती सुभाष आव्हाड, जवळा गावाचे सरपंच अनिल पवार, उपसरपंच गौतम कोल्हे, जवळा वि. वि. का.सो. चेअरमन प्रदीप पाटील, प्रशांत शिंदे, शरद हजारे, संतराम सुळ, उमेश रोडे, बाबा महारनवर, हबीब शेख, किरण वर्पे, अशोक पठाडे, प्रफुल्ल कोकाटे, अशोक हजारे, राहुल पाटील, मारुती गोरे, बाळासाहेब कोळकर, रंगनाथ ठोंबरे उपस्थित होते. यावेळी बोलताना सभापती म्हणाले की, एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. आपल्या पतीच्या निधनानंतर सती न जाता मराठीशाहीचा राज्यकारभार सक्षमपणे व निर्भिडपणे त्यांनी संभाळल्याचे सांगितले. सूत्रसंचालन विजय कोकाटे यांनी, तर आभार अजित कोकाटे यांनी मानले.