Breaking News

तळमळीचा ज्येष्ठ कार्यकर्ता गमावला


लोणी प्रतिनिधी

पाथर्डीचे माजी आ. दगडू पाटील बढे यांच्या निधनाने एक शांत, संयमी आणि सर्वसामान्याशी बांधिलकी असलेले व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. अतिशय सर्व सामान्य कुटुंबातून आलेले व्यक्तिमत्व म्हणून बढे यांची ओळख होती. सामान्य माणसाच्या प्रश्नांची माहिती आणि जाणीव असल्यानेच त्यांना विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. विखे कुटुंबाशी त्यांनी स्नेह जोडला होता. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील एक तळमळीचा ज्येष्ठ कार्यकर्ता गमविल्याचे दुःख कायम मनात राहील. 

राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते.