Breaking News

अफगाणिस्तान 'आउट';भारत एक डाव २६२ धावांनी विजयी


मुंबई वृत्तसंस्था
भारताने दिलेल्या ४७४ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाची दाणादाण उडाली आणि भारताने अफगाणिस्थानचा पराभव करत एक डाव २६२धावांनी विजय मिळविला.पहिल्या डावात भारतीय माऱ्यासमोर पाहुणा अफगाणिस्तान संघ अवघ्या १०९ धावांमध्ये माघारी परतला. अफगाणिस्तानचा एकहीफलंदाज भारतीय माऱ्यासमोर तर धरु शकला नाही. मोहम्मद नाबीचा अपवाद वगळता एकही फलंदाज फारशी चमक दाखवू शकला नाही. एकामागोमाग एकफलंदाज माघारी परतण्याचं सत्र सुरु राहिल्यामुळे भारतीय गोलंदाजांचं चांगलच फावलं. नाबीने २४ धावा केल्या. पहिल्या डावात अफगाणिस्तानचा संघ ३६५धावांनी पिछाडीवर पडल्यामुळे, भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने अफगाणिस्तानला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज दिवसभरातअफगाणिस्तानचा संघ आपला डावाने होणारा पराभव किती वेळ टाळू शकतो याची उत्सुकता सर्वाना लागून होती.

भारताकडून रविचंद्रन आश्विनने ४, इशांत शर्मा-रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी २-२ तर उमेश यादवने १ बळी घेतला. अफगाणिस्तानचा एक फलंदाज हार्दिकपांड्याच्या अचूक फेकीमुळे धावचीत झाला.