Breaking News

माजी विद्यार्थ्यांनी जपलं महाविद्यालयाशी नातं

टाकळी ढोकेश्‍वर / वार्ताहर । 
न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालय पारनेर महाविद्यालयात आजरोजी माजी विद्यार्थ्यांनी मिळून 20 हजार रूपयांची देणगी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मदत स्वरूपात प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांचेकडे सूपूर्द केली.
1992 पासून ज्या विद्यार्थ्यांनी आपलं नातं या महाविद्यालयाशी सातत्याने संवर्धित केलं, अशा अखंड मैत्री ग्रुपच्या डॉ. संदिप औटी, रमेश भोसले, जयश्री घावटे, संतोष गाढवे, हिरा लटांबळे, संजय दुधाडे, बबन चव्हाण, रामदास औटी, मंच्छिद्र बोरूडे, विनायक कानडे, पोपट औटी, लता औटी आदी माजी विद्यार्थ्यांनी सदर मदत स्वयंस्फूर्तीने अदा केली. प्राचार्य डॉ. आर.के. आहेर यांनी सर्वांचे आभार मानले.