Breaking News

सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चार लाखाची फसवणूक

सोलापूर, दि. 02, जून - सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चार लाख रुपये उकळून फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रकांत माने, दयानंद माने, प्रमोद माने, काका खंडागळे, रामदास दहिफळे, परदेशी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. डिसेंबर 2015 ते 24 नोव्हेंबर 2017 या कालावधीत हा प्रकार घडला. 

यातील फिर्यादी धनाजी गवळी यांचे कुटुंबीय पदवीधर विजय गवळी याच्यासाठी नोकरीच्या शोधात होते. त्यांचे नातेवाईक दुधाळ (रा. पाथरूड) यांनी चंद्रकांत माने सैन्यात नोकरी लावतो, असे सांगितले. त्यासाठी त्याने त्याला व सैन्यातील दहिफळे यांना सात लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हटल्याचेही सांगितले. तडजोडीने चार लाख देण्याचे ठरले. फेब्रुवारी 2016 मध्ये संशयितांनी गवळी यांच्या घरी जाऊन विजय याचे सैन्यात भरती झाल्याचे सांगून यादी दाखवली. गवळी हे रामदास दहिफळे यांच्याशी फोनवर बोलल्यावर परदेशी यांना देण्यासाठी माने यांच्याकडे पैसे द्यायला सांगितले. त्यानुसार त्यांनी दोन लाख रुपये दिले. उर्वरित दोन लाख नोकरीची ऑर्डर आल्यानंतर देतो असे सांगितले. त्यानंतर खोटी ऑर्डर देऊन पुन्हा दोन लाख उकळले. पाच सहा महिन्यांनंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले