Breaking News

इफ्तार पार्टी सर्व धर्म एकतेचे प्रतिक : सपोनि परदेशीनगर ता. प्रतिनिधी : मुस्लिम बांधवांसाठी रजमान हा पवित्र महिना मानला जातो. उपवास सोडण्यासाठी हिंदू-मुस्लिम बांधव सर्वजण एकत्र येऊन इफ्तार पार्टीचे आयोजन करतात, ही आनंदाची बाब आहे.

अशा इफ्तार पार्टीतून एकात्मता वाढीस लागते. हे सर्वधर्म एकतेचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक किशोर परदेशी यांनी केले.

नगर तालुक्यातील भातोडी येथे मस्जिद परिसरात फ्रेंड्स ग्रुप, भातोडी ग्रामपंचायत आणि व ग्रामस्थांच्यावतीने मंगळवारी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगर तालुका पोलीस ठाण्याचे स.पो. नि. किशोर परदेशी, अक्षय कर्डिले, बाळासाहेब जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष पापामिया पटेल, सरपंच बाबासाहेब नेटके, उपसरपंच भरत लबडे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बबनराव घोलप, उपाध्यक्ष राजू पटेल, शिवसेना शाखाध्यक्ष भाऊसाहेब धलपे, आदिनाथ शिंदे, निसार शेख, रफिक पटेल, ग्रामपंचायत सदस्य अमोल कदम, पोपट पटेल, रियाज शेख, सिराज पटेल, अमजद पटेल, सोमनाथ शिंदे, घनश्याम राऊत, ताजू पटेल, अन्सार शेख, बाबा पटेल, समीर पटेल, शाम घोलप, राजू काळे, गणेश गायकवाड, लालु पटेल, गणेश कदम, लक्ष्मण कदम, रतन बनसोडे आदी उपस्थित होते.