Breaking News

सीमारेषेवर ’कटुता’; यंदा पाकला मिठाई नाही

सीमारेषेवरील भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. रमजान काळात भारताने शस्त्रसंधीची घोषणा केली असताना पाकिस्तानकडून कुरापती सुरूच होत्या. त्यामुळे भारताने ईदच्या दिवशी करण्यात येणार्‍या मिठाई देवाणघेवाणीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आपली नाराजी व्यक्त केली. दिवाळी आणि ईदच्या दिवशी सीमारेषेवर दोन्ही देशांकडून मिठाईची देवाणघेवाण केली जाते. गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते. पाकिस्तानी सैनिकांकडून पुढाकार दाखविण्यात आला. मात्र, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मिठाईच्या देवाणघेवाणीस नकार दर्शविला.