Breaking News

17 नंबर फॉर्म यंदा शेवटचा ठरण्याची शक्यता - सुनिल गाडगे


नगर - दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘फॉर्म 17’ चे हे शेवटचे वर्ष ठरणार आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून फॉर्म 17 भरून दहावी-बारावीच्या परीक्षेस बसू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षा मुक्त विद्यालय मंडळ घेणार असल्याचे संकेत आहे. या दिशेने मुक्त विद्यालय मंडळाची रचना तयार करण्याचे कार्य अभ्यास गटाकडून केली जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे शासकिय सचिव डी.एल.थोरात यांनी दिल्याची शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात दरवर्षी दहावी आणि बारावी मिळून सुमारे एक ते दोन लाख विद्यार्थी 17 क्रमांकाचा फॉर्म भरून परीक्षा देतात. यामध्ये प्रामुख्याने नववीत किंवा अकरावीत नापास झालेले विद्यार्थी आणि काही कारणांनी नियमित शिक्षण घेऊ न शकणार्‍या विद्यार्थ्यांचा समावेश असतो, मात्र ही मुभा शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून बंद करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. या विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळावे आणि दहावी-बारावीच्या परीक्षेत मूलभूत विषयांबरोबरच आवडीच्या विषयांचीही निवड करता यावी, या उद्देशाने या विद्यार्थ्यांना राज्यात लवकरच सुरू होणार्या ‘मुक्त विद्यालय मंडळा’तर्फे परीक्षा देता येणार आहे.
शिक्षक भारती संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक नेते सुनिल गाडगे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, शहर जिल्हाध्यक्ष प्रदिप रुपटक्के, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, विजय लंके, शरद धोत्रे, सुनील जाधव, जया गागरे, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, संध्या गावडे, जिल्हा महिलाध्यक्षा आशा मगर, सचिव विभावरी रोकडे,महिला कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी, शैला कुटीनो, बेबीनंदा लांडे, संगिता भालेराव, जयश्री ठुबे, मंजुषा गाडेकर, माधुरी सोनार, तृप्ती वराळ, मंजुषा शेडगे, लता पठारे, सुरेखा काळे, संगिता धराडे, सविता शितोळे, नौशाद शेख, वर्षा दरेकर, शारदा लोंढे, साधना शिंदे, श्रीकांत गाडगे, ग्रथपाल संघटनेचे अध्यक्ष विलास गाडगे, जॉन सोनवणे, अशोक धनवडे,संभाजी चौधरी, संपत लबडे, नवनाथ घोरपडे, काशिनाथ मते आदींनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे शासकीय सचिव डी.एल.थोरात यांची भेट घेऊन इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या 17 नंबर परिक्षा फॉर्म भरुन सविस्तर चर्चा केली असता. डी.एल.थोरात यांनी सांगितले कि, या विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील 17 क्रमांकाच्या फॉर्मसाठीच्या केंद्रातून मार्गदर्शन मिळत असते. राज्यात नव्याने सुरू होणार्‍या ‘मुक्त विद्यालय मंडळा’ कडून परीक्षा देण्याची मुभा देण्यात यावी, असा विचार शासन स्तरावर सुरू आहे. यावर शिक्कामोर्तब झाल्यास फॉर्म 17 भरून परीक्षा देण्यासाठी 2018-19 हे शेवटचे वर्ष ठरणार आहे. केवळ पाचवी, आठवी, दहावी व बारावीची परीक्षा देऊन व त्यासाठी मोजके विषय निवडून पारंपरिक ‘शिक्षण धर्म’ पाळता येणार आहे. दहावीचा अभ्यासक्रम नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच अप्रगत विद्यार्थी, दिव्यांग, कलाकार, खेळाडू अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि ते मुख्य शिक्षण प्रवाहातही राहावेत, यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मुक्त विद्यालय मंडळ हा राज्य शिक्षण मंडळाचा भाग असेल. त्याद्वारे 2018-19 या शैक्षणिक वर्षांपासून शिक्षण सुरू होणार आहे. याचा अभ्यासक्रम ठरविण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. या मंडळालाही दहावीचा अभ्यासक्रम हा नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच असावा असाही एक विचार सुरू आहे. यामुळे भविष्यात हा निर्णय झाल्यावर फॉर्म 17 बंद करून या मंडळामार्फत परीक्षा देण्याचा मार्ग खुला होऊ शकणार आहे.