Breaking News

बस दरीत कोसळून 33 प्रवासी ठार दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांचा समावेश ; आंबेनळी घाटातील दुर्घटना

सातारा : महाबळेश्‍वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची मिनी बस शनिवारी प्रतापगड घाटात कोसळून झालेल्या भीषण अपघातात 33 प्रवासी ठार झाले आहेत. तर सुदैवाने बसमधील एक प्रवासी बचावला. दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्‍वर येथे फिरायला निघाले होते. शनिवारी सकाळी  10 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर घाटात त्यांची मिनी बस खोल दरीत कोसळली. या घटनेची पोलादपूर व महाबळेश्‍वर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या मदतीने बचावकार्य सुरु केले आहे. आतापर्यंत दरीतून आठ मृतदेह काढण्यात यश आले आहे. अपघाताची गांभीर्यता लक्षात घेऊन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. महाबळेश्‍वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील 600 फूट खोल दरीत मिनी बस कोसळून भीषण अपघात झाला आहे. घाटातील निसरड्या रस्त्यावरून ही बस दरीत कि मान सहाशे फूट खाली गेल्याचे समजते. या दुर्घटनेत 33 प्रवासी ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर सुदैवाने बसमधील एक प्रवासी बचावला. प्रकाश ठाकूर-देसाई असे बचावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. सक ाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्‍वर येथील पोलीस अन् ट्रॅक र्सचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.

सध्या घटनास्थळावर मदत करण्यासाठी पोलादपूर पोलीस स्टेशन येथील संपूर्ण स्टाफ, महसूल विभाग, तसेच महाबळेश्‍वर येथील बचाव पथक आणि वैद्यकीय पथक हजर झाले आहे. सातारा जिल्ह्यातून रायगड जिल्ह्याकडे जाणार्‍या बसमधून कृषी विद्यापीठाचे कर्मचारी सहलीसाठी प्रवास करत होते. दरम्यान, ही बस दापोली येथील आहे.
चौकट........

केवळ एक प्रवासी बचावला 

अपघातातील प्रकाश नारायण देसाई हा एकमेव प्रवासी सुखरूप बाहेर पडला आहे, अशी माहिती पोलादपूर (जि. रायगड) येथील पोलिसांनी दिली आहे. बसमधील सर्वजण दापोली (जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. ते महाबेश्‍वरला निघाले होते. आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची बस दरीत कोसळली. अपघातानंतर वर आलेल्या प्रकाश देसाई या कर्मचार्‍याने विद्यापीठाला ही बातमी कळविल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या. अपघात झाला, तेव्हा त्या भागात पाऊस पडत होता. आता पाऊस थांबल्याने आणि त्या भागातील धुकेही कमी झाल्याने बचाव कार्याला वेग आला आहे. अपघातग्रस्त बसचा चेंदामेंदा झाला असून मृतदेहही छिन्नविच्छिन्न झाले आहेत.