उत्तर प्रदेशात पावसाचा धुमाकूल ; 48 तासात 37 जणांचा मृत्यू

लखनऊ : उत्तर प्रदेशात मागील 48 तासात झालेल्या पावसामुळे सुमारे 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. राज्यात लागोपाठ तिसऱया दिवशी शनिवारी देखील पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. जिल्हा अधिकार्‍यांना कोणत्याही स्थितिला हाताळण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार, पावसामुळे आग्रा येथे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरनगर आणि कासगंजमध्ये तीन, मेरठ आणि मैनपुरीमध्ये चार, बरेलीमध्ये दोन आणि मथुरा, गाजियाबाद, हापुड, रायबरेली, जालौन, जौनपुर, प्रतापगढ, बुलंदशहर, फिरोजाबाद आणि अमेठी येथे एका जणाचा मृत्यू झाला आहे. सहारनपुर येथे बचाव कार्यादरम्यान शुक्रवारी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घर ढासळणे, भिंत पडणे, वीज पडणे, अशा घटनांत 25 लोक जखमी झाले आहेत. राज्यातील प्रमुख क्षेत्रात जोराचा पाऊस पडत आहे. काही नद्यांना पूर आला आहे. राज्याच्या राजधानीमध्येही रात्रीपासून पाऊस पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी येथे येणार आहेत. हरिहरनगर, इंदिरानगर, गोमतीनगर, सप्रू मार्ग, अलीगंज, सीतापूर रोड आणि अमीनाबाद येथे वीजेची तार तूटणे आणि ट्रांसफार्मर जळाल्याने वीज गेली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget