Breaking News

साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन


संगमनेर / प्रतिनिधी

शहरातील प्रवरानदी तीरावरील श्री साईबाबा मंदिरात सालाबादप्रमाणे यावर्षीही गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त दि. २० ते २७ जुलै दरम्यान सामुदायिक अखंड साईचरित्र पारायण सोहळा होणार आहे. २० जुलै रोजी सकाळी साडे सहा वाजता पारायण सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. या पारायणासाठी भाविकांनी नावे मंदिरात नोंदवावीत, असे आवाहन साई मंदिर व्यवस्थापन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. संगमनेरातील श्री साईनाथ मंदिरातील ओम साई ग्रुपच्यावतीने संगमनेर ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ८ रोजी सकाळी सात वाजता संगमनेरातील साई मंदिर येथून ही साईपालखी शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे.