ध्यानाने आत्म्याची ओळख करून घ्या : मेहता

कोपरगाव शहर प्रतिनिधी
तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज येथे गुरुपौर्णीमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चराचर विश्वाच्या  आत्म्याच्या कल्याणासाठीचे कार्य आत्मा मालिक ध्यानपीठाकडून सुरू आहे. या कार्याचा मी एक कार्यकर्ता असून गुरूदेवांनी दिलेल्या जबाबदारीचे गांभीर्य ठेवून कार्य करत आहे. जगाच्या पाठीवर आत्मा हाच परमात्मा आहे आणि तो आपल्या हृदयात नांदतो. त्याची ओळख ध्यानाने होते. ध्यान करा आणि आत्म्याची ओळख करून घ्या, असे आवाहन प्रकाश मेहता  यांनी केले.
गुरूपौर्णिमा उत्सवाच्यानिमित्त विश्वात्मक  जंगली महाराज आश्रमामध्ये उभारण्यात आलेल्या आत्मा मालिक मंदिराचे उदघाटन कोनशीलेचे अनावरण प्रसंगी मेहता बोलत होते. गुरुपौर्णिमेच्या पावन मुर्हूतावर आश्रमाचे उपाध्यक्ष भगवानराव दौंड यांनी आत्मचिंतनावर लिहिलेल्या ‘ध्यान’ या पुस्तकाचे महेता आणि अन्य उपस्थितांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे दामोधर मानकर यांनी आत्म्यावर लिहिलेल्या ‘सबका मालिक आत्मा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आत्मा मालिक शैक्षणिक सकुंलाच्या १३० विद्यार्थ्यांनी सामुहिक नृत्यातून सबका मालिक आत्मा हा संदेश  देणारा नृत्याविष्कार सादर केला. अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील होते.
व्यासपीठावर आ. स्नेहलता कोल्हे, राहुल जगताप, बाळासाहेब सानप, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, हेमंत सवरा, माजी आ. दिलीप मोहिते, बापूसाहेब पठारे, नाशिक धर्मादाय विभागाचे सह आयुक्त प्रदिप घुगे, गोदावरी दूध खोरेचे चेअरमन राजेश परजणे आदींसह जंगली महाराज आश्रमचे संत देवानंद महाराज, संत परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त रामराव थोरात, कमलताई पिचड, निवृत्ती बोडखे, कोकमठाणच्या सरपंच अलका लोंढे आदींसह देशविदेशातील भाविक उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget