Breaking News

मल्टीप्लेक्स वाल्यांना दणका

मल्टीप्लेक्स, महामार्गावरील फुडमॉल व मॉलमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास घालण्यात येणारी बंदी आणि आतील खाद्यपदार्थांची जादा दराने होणारी विक्री याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. मल्टीप्लेक्स चालक बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव करतात व आतमध्ये त्यांच्याकडील खाद्यपदार्थांची चढ्या दराने विक्री करतात, असा आरोप करून यासंबंधी कायदा करण्याची मागणी केली. त्यावर राज्यमंत्री चव्हाण यांनी हा निर्णय दिला आहे.