Breaking News

शिवजयंती उत्सव समितीतर्फे शालेय साहित्य वाटप


प्रतिनिधी | संगमनेर

‘आमची समिती, आमची ताकद’ हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या संगमनेरमधील शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने होतकरु विद्यार्थ्यांना तब्बल दीड लाख रुपये किंमतीच्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. बुधवारी नवीन मराठी माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाला प्रारंभ झाला. दरम्यान शालेय साहित्य मिळताच विद्यार्थ्यांचे चेहरे उजळले.

याप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल कवडे, उपाध्यक्ष दिपक वन्नम, शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, उत्सव समितीचे माजी अध्यक्ष पप्पू नेहूलकर, नरेश माळवे, सचिन पलोड, गिरिश देशपांडे, चंदू काळण, मनिष माळवे, राजेश दोशी, विजय उदावंत, प्रसाद गोरे, विनायक वाडेकर आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.