Breaking News

माजी आ. काळेंनी पाण्याची सोय २०११ लाच केली : वर्पे

**
कोपरगाव ता. प्रतिनिधी
निळवंडे धरणाचे पाणी कोपरगाव शहराला मिळाले तर कोपरगाव शहराचे नागरिक स्वागतच करतील. परंतु निळवंडे धरणाच्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार निळवंडे पाईपलाईन पाणी योजनेची आखणी आगामी २०४५ सालची कोपरगाव शहराची लोकसंख्या गृहित धरून केलेली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव नगरसेवक संदीप वर्पे यांनी दिली.
वर्पे म्हणाले, शहराची २०४५ च्या पाण्याची मागणी २४.९७ एम. एल. डी.  एवढी असणार आहे. त्यामध्ये नांदूर मधमेश्वर धरणातून सध्या मिळणारे १२.५ एम. एल. डी. पाणी वजा केल्यास शिल्लक राहिलेले १३. ४९ एम. एल. डी. पाणी हे निळवंडेतून दर वर्षीच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात घ्यावे,  असा प्रस्ताव आहे. २०१८ साली जर हा प्रोजेक्ट सुरु झाला तर दैनंदिन २ लाख ४० हजार लिटर पाणी मिळू शकते, असे प्रोजेक्ट रिपोर्ट व तांत्रिक मंजुरीमध्ये नमूद केलेले आहे. याचा अर्थ वर्षाकाठी ८ कोटी ७६ लाख लिटर पाणी घ्यावे, असे नमूद केले आहे.
दरम्यान, सताधारी नगरसेवकांनी ही सभा उधळून लावणे चुकीचे आहे. कोपरगावची जनता अशा विकासाप्रती असंवेदनशील असणा-या नगरसेवकांना कधीच माफ करणार नाही, असेही वर्पे म्हणाले. यावेळी विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगुले, माधवी वाकचौरे, सैदाबी शेख आदी उपस्थित होते.