नगराध्यक्षपदासाठी घायतडक यांचा उमेदवारी अर्ज


जामखेड / प्रतिनिधी । 
नगराध्यक्षपदासाठी निखिल मुकूंद घायतडक यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे  निखिल घायतडक यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. जामखेड नगरपालिकेला अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. तेंव्हा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा कार्यकाळ संपत असल्याने पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीसाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 1 ऑगस्ट रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या निवडी जाहीर केल्या जाणार आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक विद्या राजेश वाव्हळ व निखिल घायतडक हे दोन उमेदवार इच्छूक होते. मात्र पालकमंत्री ना. राम शिंदे यांनी अहमदनगर येथे सर्व पदाधिकार्‍यांची बैठक घेवून सव्वा-सव्वा वर्षे दोघांना नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ देण्याचे ठरले आहे. पालकमंत्री ना. राम शिंदे यांच्या आदेशावरून  शुक्रवारी दुपारी 1.45 वा. निखिल मुकूंद घायतडक  यांनी नगराध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज मूख्याधिकारी विनायक औधकर यांच्याकडे दाखल केला आहे. निखिल घायतडक यांनी दोन अर्ज दाखल केले होते, पहिल्या अर्जावर सूचक नगरसेवक ऋषिकेश बांबरसे व अनुमोदक नगरसेवक अर्चना राळेभात तर, दुसरया अर्जावर सूचक नगरसेवक विद्या वाव्हळ व अनुमोदक अर्चना राळेभात होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रवि सुरवसे मनोज कुलकर्णी प्रविण सानपसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget