बोंडअळीसाठी प्रभावी उपाययोजना कराव्या : जिल्हाधिकारी द्विवेदी


मिरजगाव / वार्ताहर । 
बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सुचवलेल्या उपाययोजना, प्रभावीपणे राबवुन होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषीविभाग आणि जिनिंग व प्रेसिंग मिलच्या संचालकांनी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
मिरजगाव येथील छत्रपती जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग मिलला भेट दिल्यावर केले. यावेळी जिनिंगचे चालक राहुल पवार, दादासाहेब बांदल, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण सावंत, जिल्हा कृषी अधिकारी पंडीत लोणारे, तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर, मंडलाधिकारी सोनाली हजारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपत बावडकर, भाऊसाहेब पवार, अभंग बोरुडे, दादासाहेब तनपुरे उपस्थित होते.
बोंडअळीवर शासनाने सुचवलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्ह्यातील जिनिंग मिल संचालकाना स्वतंत्र बैठक घेऊन दिली होती. त्याची अंमलबजावणी कशी होत आहे, यासाठी त्यांनी अचानक मिरजगाव येथे भेट देवून पाहणी केली.  छत्रपती जिनिंग मिलच्या संचालकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
या दरम्यान  नाना हुमे, आंबादास चौरे, सुरेंद्र चौरे, भानुदास चव्हाण या शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन छत्रपती जिनिंग मिलचे संचालक राहुल पवार व दादासाहेब बांदल यांनी सहाय्यक कृषी अधिकारी सचिन कालेकर, तलाठी विश्‍वजित चौगुले, शरद पवार यांच्या उपस्थितीत बोंडअळीचा बिमोड करण्यासाठी फोरोमन ट्रॅपचे वाटप करुन त्याचा वापर कसा करायचा याची माहिती दिली. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget