Breaking News

सीआरपीएफचे दोन जवान शहीद

अनंतनाग- दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवान शहीद झाले आहेत. अनंतनाग जिल्ह्यातील शीरपोरामध्ये ही घटना घडली. सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान जखमी झाले होते. या जवानांना उपचारासाठी तेथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या दोघा जवानांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी जवळपास दहा मिनिटे गोळीबार केला.