मराठा आंदोलन : सरकार घेणार राणे, उदयनराजे, संभाजीराजेंची मदत

मुंबई : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आणि राज्यभर पेटलेले मराठा आंदोलन शांत करण्यासाठी आता राज्य सरकार विविध पर्यायांवर विचार करायला लागला आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे आणि भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपतींची आंदोलन शमवण्यासाठी मदत घेतली जाणार, असल्याची माहिती पुढे येत आहे. आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं सरकारच्या सूत्रांकडून माहिती मिळतेय. मागील अनेक दिवस राज्यात मराठा आरक्षणावरून हिंसक आंदोलन सुरू असताना ते थांबवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले नाहीत. मात्र, आता आंदोलन जास्त पेटू लागल्यानं राज्य सरकारने विविध घटकांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसात अनेकांनी आपला राजीनामा दिल्याने अनेक घडोमोडी थांबविण्यासाठी आता सरकार उदयनराजे, संभाजी महराज आणि नारायण राणे यांची मदत घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष असलेले नारायण राणे यांनी मराठा संघटनांशी चर्चा करावी अशी सूचना मांडल्या आहेत. त्यामुळे आता सर्व स्तरावरून पेटलेले मराठा आंदोलन शांत करण्याचा सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकारची धावपळ उडालेली स्पष्ट दिसत असताना त्यांना आता उदयनराजे, संभाजीराजे आणि राणे यांची मदत घेतल्या शिवाय पर्यांयच उरला नसल्याचे चित्र आहे. हिंगोलीमध्ये आमदाराला धक्काबुक्की जिल्ह्यात चौथ्या दिवशी देखील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडुन सुरू असलेल्या आंदोलनाचे संतप्त पडसाद उमटले आहेत. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर येथे रास्ता रोको दरम्यान राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार रामराव वडकुते यांना धक्काबुक्की करण्यात आली असून जलसंपदा विभागाच्या उर्ध्वपैनगंगा प्रकल्प क्रमांक 4 चे कार्यालयही पेटविण्यात आले आहे. तसेच दाती पाटी येथे नांदेड-हिंगोली रस्त्यावर टायर जाळुन ट्रक पेटविण्यात आला. तर सेनगाव या तालुक्याच्या ठिकाणी बंद पाळण्यात आला असून गटशिक्षणाधिकारी कार्यालय पेटवून देण्यात आले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget