सामाजिक मागासलेपणाच्या आधारावरच आरक्षण शक्य : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

नाशिक - राज्य घटनेनुसार मराठा समाजास आर्थिक निकषांच्या नव्हे तर सामाजिक मागासलेपणाच्या आधारेच आरक्षण देता येणे शक्य आहे, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. नाशिकमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुटावा, अशी स्पष्ट भूमिका कोणीच मांडत नाही. शरद पवार यांनी आरक्षणासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागेल असे सांगितले. यापूर्वी त्यांनी आर्थिक निकषांवर आरक्षणाची भूमिका मांडली होती. त्यांनी आधी घटना दुरुस्तीचा मसुदा सादर करावा, त्यामुळे अधिक स्पष्टता येईल. आधी सत्ताधारी भाजप सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनी धनगर समाजाला अनुसुचीत जाती- जमातीचे आरक्षण देता येत नाही, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. त्यामुळे धनगर समाजाने आपली भूमिका आणि दिशा स्पष्ट करुन सत्ताधारी पक्षाबरोबर राहण्याऐवजी स्वतंत्र वाट चोखाळली. मराठा समाजालाही असेच करता येईल, असे मत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन आणि गोलमेज परिषदेत सामाजिक मागासलेपणावर आधारीत आरक्षण देण्याची भूमिका मांडली होती. त्याआधारे मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य आहे. आजही राज्य घटनेनुसार आर्थिक निकषांच्या नव्हे तर सामाजिक मागासलेपणाच्या आधारेच आरक्षण शक्य आहे. मराठा समाज अद्यापही आपल्या नेत्यांच्या आदेशावर विश्‍वास ठेवतो. समाज त्यातून बाहेर पडला तरच नॉन मराठा नेते आपली भूमिका मांडू शकतील. अन्यथा, त्यांच्या भूमिकेवर रिऍक्शन येण्याचा धोका आहे, असेही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget