गुरूंकडूनच जीवनात ज्ञानाची प्राप्ती - महंत चंद्रशेखर भारती महाराज




नेवासा (प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील बहिरवाडी देवस्थानचे मार्गदर्शक महंत चंद्रशेखर भारती महाराज यांचे संतपूजन गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून करण्यात आले. शिष्यांच्या या अगाध नात्यांचे दर्शन गुरुपौर्णिमेला घडले. यावेळी असंख्य शिष्यांनी गुरूंचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतले. गुरू हाच जीवनात खरा मार्गदर्शक असून दिशा देण्याचे व चांगला मार्ग दाखविण्याचे कार्य ज्ञानाची प्राप्ती ही गुरूंकडूनच होत असल्याचे प्रतिपादन यावेळी महंत चंद्रशेखर भारती महाराज यांनी केले. जामगाव येथील साईनाथ भाग्यवंत यांच्या वस्तीवर गुरुपौर्णिमेनिमित्त संतपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महंत चंद्रशेखर भारती महाराजांचे असंख्य शिष्य यावेळी उपस्थित होते.
      याप्रसंगी झालेल्या संतपूजन कार्यक्रमात गुरुपाद्यपूजन संत प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक साईनाथ भाग्यवंत यांनी आलेल्या शेकडो शिष्य व भक्त परिवाराचे स्वागत केले. या कार्यक्रमाला संत सेवेकरी बदामराव पठाडे, बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष अशोक
राव कोलते, बहिरवाडीचे सरपंच नंदूभाऊ वाखूरे, गोधेगावचे उपसरपंच गोपीनाथ पल्हारे, संत सेवक आबासाहेब मते, तुकाराम चौधरी, धनंजय गुजर, प्रमोद मोरे, अँड.इंद्रजीत नागरे, नंदूभाऊ जमधडे,रामनाथ वाकडे,गोरक्षनाथ पठाडे, जळके खुर्दचे पोलीस पाटील नारायण शिंदे, राजेंद्र नळघे उपस्थित होते. यावेळी
उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget