बँक ऑफ महाराष्ट्राचा शेतकरी मेळावा उत्साहात


वरुर/ प्रतिनिधी.28-  बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरुर व शेवगाव यांचा संयुक्तपणे शेतकरी मेळावा वरुर या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी बँकेचे कृषी अधिकारी कुलदीप भड यांनी शेतकर्‍यांना कृषी योजनांची माहिती दिली. तसेच पीक कर्ज योजनेसाठी लागणारे कागदपत्र त्यांचे निकष याविषयी सखोल मार्गदर्शन केले तर वरुर बँकेचे व्यवस्थापक सूर्यभान मुरमुरे व शेवगाव महारा÷ष्ट्र बँकेचे व्यवस्थापक दुसाने यांनी शेतकर्‍यांना विविध कर्ज योजनांची माहिती देऊन शेतकर्‍यांच्या शंकांचे निरसन केले . तसेच कर्जमाफी योजनेची माहिती दिली. नवीन पीककर्जासाठी बँक ऑफ महाराष्ट्र वरूर व शेवगाव या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी शेतकर्‍यांना केले. तसेच कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज देण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच नवीन पीक कर्ज मंजूर झालेल्या शेतकर्‍यांना प्रमाणपत्राचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाबँकेचे कुलदीप भड , सूर्यभान मुरमुरे, दुसाने , वीरेंद्र भालसिंग. पांडे ,  दिनकर महाराज अंचवले , भागवत लव्हाट,  ऊपसरपंच गोपाळ खांबट, मा. सभापती मधुकर वावरे, अशोक आप्पा खांबट, माणिकराव म्हस्के, शमशेरभाई पठाण तसेच महाबँकेचे शेवगाव व वरुर शाखेचा कर्मचारी वर्ग व सभासद पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget