Breaking News

‘गौतम’च्या उपाध्यक्षपदी साहेबलाल शेख

कोपरगाव : तालुक्यातील गौतम सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी बँकेचे विद्यमान संचालक साहेबलाल शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. मावळते उपाध्यक्ष अनिल महाले यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर शेख यांची निवड करण्यात आली. बँकेच्या संचालक मंडळाची बैठक मुख्य कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच पार पडली. नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे बँकेचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आ. अशोक काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले. करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.