Breaking News

मद्य प्राशन करणार्‍या शिवशाहीचा चालकाविरूद्ध गुन्हा !

अहमदनगर : राज्यात अपघातांची संख्या मोठया प्रमाणात वाढली असून, याला चालकांचा बेजबाबदारपणा कारणीभूूत असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना शनिवारी अहमदनगरच्या स्वस्तिक बस स्टँण्ड वर घडली. पैठण ते मुंबई (गाडी नंबर एमएच-20- 3145)या मार्गावर चालु असलेल्या शिवशाही या गाडीच्या चालकांचे वर्तन उद्दामपणांचे आढळून आल्याने, तसेच गाडी व्यवस्थित चालवत नसल्यामुळे चालकाने मद्य प्राशन केले असल्याची शंका प्रवाशांनी आगाप्रमुखांनी केली. दादा ग्यानबा कराड असे या चालकांचे नाव आहे. अखेर संबधित चालकांची मेडिकल तपासणी केली असता, तो चालक मद्य प्राशन करून गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असला, तरी या निमित्ताने पुन्हा एकदा प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे दिसून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रवास वातानुकुलित करण्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात शिवनेरी नंतर शिवशाही दाखल झाली. मात्र शिवशाही आल्यानंतर काही दिवसांतच अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.