भगतसिंग ब्रिगेडच्यावतीने निवेदन, पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदलाची मागणी


श्रीरामपूर / प्रतिनिधी ।
नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत शहरात वार्ड नं. 3 मधील तलवार बिल्डिग, बाजारतळ, स्टेट बँक परिसरातील नागरिकांना करण्यात येणार्‍या अवेळी पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल करून, सकाळी 6 ते 8 या दरम्यान करण्याच्या मागणीसाठी क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेडच्यावतीने मुख्याधिकारी बी. डी. बिक्कड यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील वार्ड नं. 3 परिसरातील नागरिकांना नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. सदरच्या पाणी पुरवठ्याची वेळ ही 11. 30 चे दरम्यान आहे.सदर परिसरात श्रमिक व कामगार मोठ्या संख्येने राहतात. सदर वेळेत बहुसंख्य महिला व पुरुष हे मोल मजुरीसाठी बाहेर जात असल्याने, केवळ नळाचे पाणी भरण्यासाठी मोलमजुरी बुडवून, अथवा विद्यार्थ्यांना शाळा बुडवून पाणी भरण्यासाठी घरी थांबावे लागत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नगरपालिकेच्या या अजब कारभारामुळे केवळ पाणी भरण्यासाठी रोजगार बुडवण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर आली आहे. यापुर्वी अनेकदा मागणी करूनही नगरपालिका प्रशासनाने सदर प्रश्‍नाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. सदर प्रश्‍नांबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास नगरपालिकेत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
यावेळी मुख्याधिकारी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांचेशी चर्चा करून, तातडीने सदर प्रश्‍नांबाबत मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले.
यावेळी क्रांतिवीर भगतसिंग ब्रिगेडचे संघटक कॉ. अमोल सोनवणे, कॉ. जीवन सुरुडे, आस्मा शेख, संगीत खरात, नंदा भुरंगे, प्रमिला निकम, ज्योती राव, अनिता गवांदे, गया खरात, वंदना सोनावणे, शांता यंदे, लक्ष्मी धोत्रे, शामाबई यादव, सुलताना शेख, आशा काहाने, अल्का जाधव, शिला निकम, बेबी मोरे, उज्वला मोरे, कांता खरात, वत्सल्ला खरात आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget