Breaking News

सद्गुरू गंगागिर महाराज महाविद्यालयाचा ७० टक्के निकाल


कोपरगाव ता. प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने घोषित केलेल्या निकालांमध्ये सद्गुरू गंगागिर महाराज सायन्स, गौतम आर्टस अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेजच्या वाणिज्य विभागाचा निकाल समाधानकारक लागला, अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. डी. पी. गाढे यांनी दिली. 

या विभागातील टी. वाय. बी. कॉम. या शाखेचा निकाल ७० . ४६ टक्के लागला. या विभागात प्रथम आलेल्या शुभम शेजवळ या विद्यार्थ्याला ८६ टक्के मार्कस् मिळाले. द्वितीय श्रेणीप्राप्त अनिल बाळासाहेब शिंदे याला ८२. ५० टक्के, तृतीय श्रेणीप्राप्त विद्यार्थिनी मुक्ता संजय देवकर हिला ७९ . ६६ टक्के मार्क्स मिळाले. या विभागातील अॅडव्हान्स अकौऊंटींग या विषयाचा निकाल चांगला लागला. यात शुभम मधुकर शेजवळ आणि शाम भगवान काकडे या विद्यार्थ्यांनी सदर विषयात चांगलेच मार्क्स मिळविले आहेत. 

महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन माजीमंत्री शंकरराव कोल्हे, सदस्य अशोक काळे, बिपीन कोल्हे, आशुतोष काळे, कारभारी आगवन, संदीप वर्पे, विजय आढाव, डॉ. गोवर्धन हुसळे, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. पी. गाढे, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब निघोट, उपप्राचार्य नानासाहेब देवकर, डॉ. बी. बी. कांदळकर, प्रा. संजय शेटे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. एस. डी. शेख, प्रा. एस. ए. सोनवणे, प्रा. ए. एम. शेख, प्रा. पी. बी. काळे, प्रा. पी. बी. यादव, प्रा. वाय. जे. पवार, प्रा. एस. आर. मोरे, अधीक्षक सुनिल गोसावी आदींनी अभिनंदन केले.