Breaking News

पर्यावरणासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी : कडपा


संगमनेर/प्रतिनिधी

पर्यावरणाचा बिघड़त असलेला समतोल, यामुळे पावसाच्या प्रमाणात झालेली घट, दुष्काळजन्य परिस्थिती आदी भीषण समस्यांवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी, असे आवाहन विद्या निकेतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिता कडपा यांनी केले.

विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड अभियानात सहभाग घेतला. यावेळी बोटा गावामधून ‘झाड़े लावा, झाड़े जगवा’, अशा घोषणा देत पर्यावरण व वृक्ष संवर्धन जपण्यासाठी वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. या वृक्षदिंडीप्रसंगी प्राचार्य सुनिता कडपा, इंजिनिअरींग कॉलेज प्राचार्य सिद्धलिंगेश, दिपाली मिंडे आदींसह शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते.