Breaking News

अनुभवी वयोवृद्ध व्यक्ती गावचे वैभव : आ. कर्डिले


अहमदनगर प्रतिनिधी
आयुष्यभर कुटुंबासाठी झटलेल्या अनेक व्यक्तींचे वृध्दापकाळात प्रचंड हाल होताना समाजात पहायला मिळते. परंतू त्यांचे योगदान लक्षात घेवून त्यांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी. आज ज्यांच्या सन्मान सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या सर्वच अनुभवी वयोवृद्ध व्यक्ती गावचे वैभव आहे, असे प्रतिपादन आ. शिवाजी कर्डिले यांनी केले. 

बु-हाणनगर येथील ज्येष्ठ नागरीक केरु कर्डिले यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त गावातील ज्येष्ठ वृद्धांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ह. भ. प. चंद्रकांत महाराज खळेकर यांचे किर्तन झाले. यानंतर उपस्थितांच्या हस्ते ज्येष्ठ व्यक्तींसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी ह. भ. प. अशोक महाराज कर्डिले, ह. भ. प. मोहिते महाराज, ह. भ. प. विश्वनाथ राऊत, अप्पासाहेब कर्डिले, पोलीस पाटील प्रकाश कर्डिले, माजी सरपंच त्रिंबक कर्डिले, बाळासाहेब वाघ, सुदाम कर्डिले, पै. अक्षय कर्डिले, पै. संदिप कर्डिले, पै. दत्ता तापकिरे परिसरातील सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर पंचक्रोशितील गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी प्रास्तविक बाळासाहेब कर्डिले यांनी केले. प्राचार्य हापसे यांनी आभार मानले.